अंकिता भंडारीच्या खून प्रकरणी तिघांना जन्मठेप   

दोषींना फाशी देण्याची आईकडून मागणी

डेहराडून : अंकिता भंडारीच्या खून प्रकरणातील तीन दोषींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी तिच्या आईने शनिवारी केली आहे. तसेच जिल्हा आणि सत्र न्यायालयाच्या निकालाला उच्च न्यायालयात आव्हान देणार असल्याचे सांगितले.अंकिता भंडारीची हत्या  पुलकित आर्य, सौरभ भास्कर आणि अंकित गुप्ता  यांनी केली होती. उत्तराखंडच्या कोटिद्वार अतिरिक्त जिल्हा आणि सत्र  न्यायालयाच्या न्यायाधीश रिना नेगी यांनी त्यांना नुकतीच जन्मठेपेची शिक्षा आणि ५० हजार रुपयांचा दंड ठोठावला होता. मात्र, ही शिक्षा अपुरी आहेे, असा दावा करत अंकिताची आई सोनी देवी यांनी त्यांना फाशी देण्याची मागणी केली आहे. अंकिता माझी एकमेव मुलगी होती. दोषींना जन्मठेप दिली आहे. मात्र, प्रकरण गंभीर असल्यामुळे त्यांना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी त्यांनी केली. आता या प्रकरंणी उच्च न्यायालयात आव्हान देणार असल्याचे त्या म्हणाल्या.  

Related Articles